-वाक्याचा अर्थ पुर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद होय.kriyapad in marathi -शब्दाचा पुर्ण अर्थ व्यक्त करणारा / क्रिया दाखविणारा शब्द म्हणजे क्रियापद होय. -क्रियापद हा वाक्यातील मुख्या शब्द असतो वाक्यात क्रियापद नसत तर वाक्याचा अर्थ पुर्ण लागला नसता.kriyapad in marathi
1.राम पेरु खातो.- क्रिया – खाण्याची. 2.गाय दुध देते. – क्रिया – देण्याची. 3.मी प्रार्थना करतो. – क्रिया – करण्याची. 4.नेहमी खरे बोलावे.- क्रिया – बोलण्याची. 5.भारताने स्पर्धा जिंकली.- क्रिया – जिकंण्याची. 6.राम शाळेत जातो. – क्रिया – जाण्याची. 7.घोडा जलद धवतो.- क्रिया – धावण्याची8. मी पैसे दिले.- क्रिया – देण्याची. 9.माझा निकाल लागला. – क्रिया – लागण्याची. 10.मी निबंध लिहतो.- क्रिया – लिहण्याची.
– क्रियापदातील प्रत्ययरहीत शब्द म्हणजे धातु होय.kriyapad in marathi धातु- मळशब्द.
रहीत-नसलेला, सहीत- असलेला
राम पेरु खातो. – क्रियापद –खा (धातु) + तो (प्रत्यय) = खातो.
– खा, उठ, कर, बस, बाग, बोल, दे, नाच, पद, पाड, बोल, हस, रांग, पेट, कर, धाव, फस,सड, वाह, ठव, खेळ, पिक, पि, जिंक, लाग, झोप, गा, चद, याना मूळ शब्द असे म्हणतात.kriyapad in marathi
उदा. 1. राम पेरु खा. 2. सचिन क्रिकेट खेळ. 3. तु खरे बोल. 4. बाळ शांत निज. 5.लता गाणे गा. 6. रोहित निबंध लिह. 7. राजेश थंड पाणी पी. 8. राम शाळेत जा. 9. रोहित डोगं र चढ. 10. तु आता नाच.
-:धातुसाधित:-
-धातुला प्रत्यय लागून क्रियापदाची विविध रुपे तयार होतात. ती रुपे क्रिया अपुर्ण दाखवितात. किंवा वाक्याचा अर्थ पुर्ण करीत नाही म्हणुन त्याना धातुसाधित असे म्हणतात
-प्रत्ययांना धातु जोडल्यास संस्कुत मधे त्याला कृदंत / कुदन्ते असे म्हणतात.
-धातुंना णे- त- तांना- ता- तू- ऊ- ऊन- ला- ली- ले- वे – यासारखी प्रत्यय लागून क्रियापदाची रुपे तयार होतात.kriyapad in marathi
धातु + प्रत्यय =धातुसाधित उठ +ऊन =उठून बस + णे = बसणे. ख + त = खात रांग+ तांना = रांगतांना कर+ ता = करता. ठेव + तू = ठेवतू हस+ ऊ = हसुन. ठेव + ली = ठेवली. खेळ + वे = खेळावे. धाव + ले = धावले
उदा. 1. राम पेरु खात आहे. 2.मी निबंध लिहीत असतो. 3.बाळ खेळतांना पडला. 4.तो चित्र काढत असेल. 5.सचिन क्रिकेट खेळत होता. 6.बाळ पाळण्यात निजला आहे. 7.लता गाणे गाऊ लागली. 8.मला त्याचे बोलणे आवडले. 9.बाळ हसत आहे
-:कर्ता:-
क्रिया करणारा हा कर्ता असतो. वाक्यात क्रियापदाने दाखविलेली क्रिया करणारा जो कोणी असतो त्यास कर्ता असे म्हणतात.
-वाक्यातील कर्ता शोधत असतांना वाक्यातील क्रियापदाचा मुळ शब्द / धातु शोधून त्यास णारा, णारी णारे या सारखे प्रत्यय लावून –—-कोण?, असा प्रश्न करवा.
मूळशब्द/ धातु +णारा, णारी, णारे ——कोण? = कर्ता
उदा. 1.राम पेरु खातो.- खा णारा कोण -राम. कर्ता – राम 2.राधा रांगोळी काढते. – काढणारी कोण -राधा कर्ता – राधा 3.मुले चित्रपट पाहतात.- पाह णारे कोण – मुले कर्ता – मुले. 4.मी पत्र लिहतो.- लिह णारा कोण – मी कर्ता – मी. 5.राजाला मुकूट शोभतो. शोभ णारे कोण – मुकुट कर्ता – मुकुट. 6.मला चंद्र दिसतो.- दिस णारा कोण – चंद्र कर्ता – चंद्र. 7.मला ताक आवडते. – आव णारे कोण – ताक कर्ता – ताक. 8.लक्षमणाला बाण लागला. -लाग णारा कोण – बाण कर्ता – बाण. 9.मला थंडी वाजते. -वाज णारी कोण – थंडी कर्ता – थंडी. 10.सचिन क्रिकेट खेळतो. खेळ णाराकाण – सचिन कर्ता – सचिन
kriyapad in marathi
-:कर्म:-
-वाक्यातील क्रिया करणारा जो कोणी असतो त्यास कर्म असे म्हणतात -क्रिया सोसणारे जे कोणी असते त्यास कर्म असे म्हणतात -वाक्यातील कर्म शोधतांना मुख्य क्रियापदाने दाखवलेली क्रिया ज्या कोणावर घडते? असा प्रश्न करावा किंता कर्त्यास काय ? असा प्रश्न करावा.
उदा. 1.राम चित्र काढतो.- काढण्याची क्रिया कोणावर घडते ? कर्म – चित्र. 2.रमेश पेरु खातेा.- खाण्याची क्रिया कोणावर घडते ? कर्म – पेरु. 3.राम निबंध लिहतो.- लिहण्याची क्रिया कोणावर घडते ? कर्म – निबंध. 4.कविता ग्रंथ वाचते.- वाचण्याची क्रिया कोणावर घडते ? कर्म – ग्रंथ. 5.संगिता रांगोळी काढते.-काडण्याची क्रिया कोणावर घडते ? कर्म – रांगोळी. 6.शिक्षक व्याकरण शिकवतो.-शिकवण्याची क्रिया कोणावर घडते ? कर्म -व्याकरण. 7.चिमणी दाणे वेचते.- वेचण्याची क्रिया कोणावर घडते ? कर्म – दाणे. 8.विजय पाणी पितो.- पिण्याची क्रिया कोणावर घडते ? कर्म -पाणी 9.सरीता फुले वेचं ते. – वेचण्याची क्रिया कोणावर घडते ? कर्म – फुले
-ज्या क्रियापदाचा अर्थ पुर्ण करण्यास कर्माचा आवश्यकता असते त्यास सर्कर्मक क्रियापद असे म्हणतात -कर्ता + कर्म +क्रियापद =सकर्मक क्रियापद. -ज्या क्रियापदाचा अर्थ पुर्ण होण्यास कर्माची आवश्यकता असते, त्यास सर्कर्मक क्रियापद असे म्हणतात
उदा. – सर्कर्मक क्रियापद 1.श्याम ग्रंथ वाचतो. 2.राम रावणास मारतो. 3.सचिन हाॅकी खेळतो. 4.सिता पत्र वाचतो. 5.गोविंद सिनेमा वाहतो. 6. रामाने धनुष्य मोडले2. 7. दादाने घर बाधले. 8. ललित पाणी पीतो. 9. रवि चित्र काढतो. 10.मी निबंध लिहतो.
2) अर्कर्मक क्रियापद:-
-ज्या क्रियापदाला वाक्याचा अर्थ पुर्ण करण्यास कर्माची आवश्यकता नसते त्यास अर्कर्मक क्रियापद असे म्हणतात -कर्त्या पासून निघालेली क्रिया कर्त्यावरच येवुन थांबत असेल त्यास अर्कर्मक क्रियापद असे म्हणतात
टिप:- विशेषण, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, सप्तमी विभक्ती हे कर्माचे कार्य नाही म्हणून त्यांना कर्म म्हणता येनार नाही.
उदा. –
1.राम धावतो. 2.पक्षी उडतो. 3.फुल संदु र दिसते. 4.मुलगा हुशार आहे. 5.घोडा जलद धावतो.:- जलद- क्रि. या. अ6. गोगलगाय हळु चालते.:- हळु- क्रि. या. अ. 7.मुलगा झाडावर चढतो.:-झाडावर – शब्द. अ. 8.सुर्य ढगामागे लवला.:-ढगामागे – शब्द. अ. 9.राम शाळेत जातो.:- शाळेत – सप्तमी. 10.सचिन मैदानात खेळतो.:- मैदानात – सप्तमी. 11.मुले दिवसा खेळतात.:- दिवसा – सप्तमी. 12.सचिन सकाळी मैदानात खेळतो.
3.द्विकर्मक क्रियापद:-
-ज्या क्रियापदाला दोन कर्म असतात त्यास द्विकर्मक क्रियापद असे म्हणतात. -या क्रियापदामध्ये वस्तुवाचक कर्म प्रत्येक्ष कर्म असते तर व्यक्तीवाचक कर्म हे अप्रत्यक्ष कर्म असते
कर्ता+ कर्म + कर्म + क्रियापद कर्ता + व्यक्ती + वस्तु + क्रियापद कर्ता + सजीव + निर्जीव + क्रियापद कर्ता + अप्रत्यक्ष = प्रत्यक्ष + क्रियापद कर्ता + चतुर्थी विभक्ती + कर्म = दान करण्याचा बोध चतुर्थी विभक्ती:- स, ला, ते, एकवचन स, ला, ना, ते अनेकवचन
उदा. –
1.मी गुरुजिंना दक्षिणा दिली. 2.मी संजयचला पुस्तक दिले. 3.शिक्षक विद्यार्थाना व्याकरण शिकवितात
4.जिजाबाई शिवाजीला गोष्ट सांगते. 5.सचिनने जहीरला चंडू दिला. 6.दादा ताईला पैसे देतो. 7.शेतकÚयाने झाडाला पाणी दिले. 8.मदारीने माकडाला नाच शिकवला. 9.आईने भिकाÚयाला कपडे दिले. 10.दक्षरयाने कैकैयला वर दिला. 11.कर्णने ईद्राला कवच कुंडले दिली.
4.उभयविध क्रियापद:
-एकच क्रियापद दोन वेगवेगळ्या वाक्यात एकदा सर्कर्मक किंवा एकदा अर्कर्मक अशा दोन्ही तÚहेने वापरता येते त्यास उभयविध क्रियापद असे म्हणतात
2.राम सकाळी खेळत असतो. 3.पक्षी गाणे गाऊ लागले. 4.आई मंदीरात जावून येते. 5.मुली फुले वेचत होती. 6.बाळ ऐवढा लाळू खाऊन टाक. 7.मुले रस्तारा धावत होती. 8.माझा निबंध लिहून झाला. 9.पक्षी चिवचिव करु लागले.
6.सहाय्यक क्रियापद:-
-संयुक्त क्रियापदातील धातुसाधीतावरुन मुख्य विधानाला केवळपुर्णतः आणण्याचे काम सहाय्यक क्रियापद करते.
-ज्या वाक्यात धातुसाधित व साहाय्यक क्रियापद हे दोघेही मिळून एकाच क्रियेचा बोध करतात तेव्हा धातूसाधीताला मदत करावयास येणाÚया क्रियापदाला सहाय्यक क्रियापद असे म्हणतात.
सहाय्यक क्रियापद वाक्याला पुर्णतःह आणण्याचे काम करतो.
-ज्या वाक्यात धातुसाधित व साहाय्यक क्रियापद हे दोघेही मिळून एकाच क्रियेचा बोध करतात तेव्हा धातूसाधीताला मदत करावयास येणाÚया क्रियापदाला सहाय्यक क्रियापद असे म्हणतात.
सहाय्यक क्रियापद वाक्याला पुर्णतःह आणण्याचे काम करतोअस – नस – हो – ते – जा – दे – लाग – टाक -ढाक – शक – पाहीजे.
अशी सहाय्यक क्रियापदाची रुपे तयार होतात
अस – आहे, असतो, असतात नस- नको, नये, नलगे, नव्हे, नसतो, नसते, नसतात, नाही हो– होता, होती, होतो, होतात. ये – येतो, येते, येणे, येतात जा- जातो, जाते, जातात दे- देतो, देते, देतात लाग-लागतो, लागली, लागतात, टाक – टाकतो, टाकाले, टाकते. शक – शकते, शकतो, शकतात, शकाल
7.प्रायोजक क्रियापद:-
-जेव्हा कोणितरी एखादी क्रिया दुसÚयाकडून करवितो त्यास प्रायोजक क्रियापद असे म्हणतात.
-कर्ता हा मूळ धातुतील क्रिया स्वतःह करीत नसून ती क्रिया करण्यास दुसÚयाला प्रवुत्त करतो त्या प्रायेजक क्रियापद असे म्हणतात.
-प्रायोजक क्रियादामध्ये क्रिया नेहमी दुसÚयाकडून होते
उदा. 1.आई बाळाला खेळविते. 2.ताई बाळाला हसविते. 3.चिमणी पिल्लना भरविते. 4.त्यानी मला सोडविले. 5.नेत्यांनी लोकांना हसविले. 6.जिजाबाईने शिषला घडविले. 7.आईने रामाला झोपेतून उठविले. 8.शिक्षकांनी आम्हाला शिकविले. 9.दादांनी मुलांना खेळविले. 10.शिक्षकांनी मुलांना गणित सोडवून दाखविले
8.शक्य क्रियापद:-
-जेव्हा ऐखाद्या क्रियापदावरुन शक्य किंवा क्रिया सार्मथ्य यांचा बोध होतो तेव्हा त्या क्रियापदाला शक्य क्रियापद असे म्हणतात – जे धातु कर्त्याला ती क्रिया करण्याची शक्यता व सामथ्र्य आहे असे दर्शविते त्यास शक्य क्रियापद असे म्हणतात. – शक्य क्रियापामध्ये क्रिया ही कत्र्याची स्वतःची असते. (शक्य कर्मणी प्रयोग)
उदा.
1. रामाला ही टेकडी चढवते. 2.संजयला दिवसा सुर्याकडे पाहवते. 3.आता थोडे काम करवते. 4.आजारी माणसाला थोडे बसवते. 5.राधाला दररोज वीस मैल चालविते. 6.सतिशला लगंडया पायाने चालवते7. तिला आता संयपाक करवते. 8.शिक्षक मुलांना समजावते. 9.आता बाळ अक्षर गिरवते. 10.त्याला आताडोगं र चढविते.
9.साधित क्रियापद:-
-नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, अव्यय यांना प्रत्यय लागून बनलेल्या क्रियापदाना साधित क्रियापद असे म्हणतात
-नामापासुन तयार होणाÚया क्रियापदाला नाम साधित क्रियापद म्हणतात.
नाम – नामसाधित पाणी – पाणावले हात – हाताळतो. 1.आईच्या आठवणीने माझे डोळे पाणावले. 2.तो ग्रंथालयातील पुस्तके नेहमी हाताळतो पाणावले, हातळतो:- या क्रियापदातील मुळशब्द पाणी व हात हे नाम असून – नामसाधितक्रियापद
क)धातु साधित क्रियापद:-
-धातुपासून तयार होणाÚया क्रियापदास धातुसाधित क्रियापद असे म्हणतात.
विशेषण +विशेषणसाधित क्रियापद
स्थिर + स्थिरावला
उदा. तो संगणक व्यवसायात स्थिरावला स्थिरावला:- या क्रियापदातील मूळ शब्द स्थिर हे विशेषण असून विशेषणसाधित क्रियापद
ब)विशेषण साधित क्रियापदः
-धातुपासून तयार होणाÚया क्रियापदास धातुसाधित क्रियापद असे म्हणतात.
धातु +धातुसाधित क्रियापद आण / आणव + आणवली मी स्पर्धा परिक्षेची पुस्तके आणवली आणवली:- या क्रियापदातील मुळ शब्द आण / आणव असुन म्हणून धातुसाधित क्रियापद.
ड)अव्यय साधित क्रियापद:-
-अव्यय पासून तयार होणाÚया क्रियापदास अव्यय साधित क्रियापद असे म्हणतात. (क्रि.वी.अ.चा. उपयोग) अव्यय अव्ययसाधित क्रियापद
पुढे पुढारली ग्रामीण भागातील लोक आता पुढारली पुढे:- या क्रियापदातील मुळ शब्द क्रि.वी.अ. असून म्हणुन अव्यय साधित क्रियापद पाणावल हाताळला स्थिरावला आणवली पुढारली
10.सिध्द क्रियापद:-
–जा- ये – कर – बस – चल – नीज याला सिध्द धातु असे म्हणतात
वरील धातुंना प्रत्येय लावुन बनलेल्या क्रियापदांना सिध्द क्रियापद असे म्हणतात
उदा. धातु / मुळशब्द / सिध्द शब्द +प्रत्यय जा + तो = जातो
उदा. उदा. मी शाळेत जातो. जा+तो 2.ती लवकर परत येते.:– ये+ते 3.मुले देवाची प्रार्थना करतात.:- कर + तात 4.विद्यार्थी खाली बसले.:- अस+ ले 5.आम्ही सकाळी उठतो.:- उठ+ तो 6.तो पायी चालतो.:- चल + तो 7.बाळ शांत निजला.:- निज + ला
11.अनियमित क्रियापद:-
-(गौण क्रियापद)मराठीत असे काही धातु आहे. किं त्यांना काळाचे व अर्थाचे सर्व प्रत्यय न लागता ते थोड्या वेगळ्या प्रकारे चालतात. त्यांना अनियीमत क्रियापद असे म्हणतात
आहे- पाहीजे – नको – नलगे – नये – नव्हे – नाही. याना अनियीमत क्रियापदे असे म्हणतात.
या क्रियापदाचे किंवा त्याची मुळ रुपे क्रिया पदेच असून त्यात अमुक धातु आहे असे निश्चितपणे सांगता येत नाही
उदा.
1.नेहमी खरे बोलावे. 2.सकाळी नियीमत व्यायाम करतो. 3.राम अभ्यास करतो. 4.वैशाली शाळेत जाते. 5.आज रविवार आहे. 6.सुर्य पुवीकडे उगवत असतो. 7.माझी परीक्षा काल संपली. 8.नागरीकांनी वृक्षारोपण करावे. 9.विद्यार्थांना पुरस्कार मिळाला. 10.स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे
12.भावकर्तृत क्रियापद / अकर्तृक क्रियापद:-
-वाक्यात क्रियापदातील क्रिया करणारा कर्ता असावा लागतो .
-परंतु काही वाक्यात क्रियापदाचा भाव कत्र्याचे काम करीत असतो म्हणजेच कर्ता हा क्रियापदाच समावलेल्या / समाविष्ट दिसतो. म्हणुन त्यास भावकतृक क्रियापद असे म्हणतात.
उदा. 1. मी मुंबईस पोहचण्यापुर्वीच सांजावले. क्रियापद:- सांजावले मुळ शब्द/ धातु =सांज =संध्याकाळ स्त्री
मुळशब्द + णारी =—-कोण? =कर्ता सांजणरी —-कोण? कर्ता-सांज कर्ता-सांज हा क्रियापदामध्ये समावलेला दिसतो म्हणून सांजवले भावकर्तुक क्रियापद
उदा. 2.उजाडले तेव्हा सहा वाजले होते? क्रियापद=उजाडले मूळ शब्द उजाड =दिवस—पुमूळ शब्द $ णारा —-कोण? =कर्ता उजाडणारा —- कोण? कर्ता- उजाड कर्ता- उजाड क्रियापदामध्ये समावलेला / समाविष्ट दिसतो त्यास उजाडले भावकर्तृक क्रियापद
उदा. 3.आज दिवसभर सारखे गडगडते क्रियापद – गडगडलते मूळ शब्द – गडगड—- न.पु. धातु मुळशब्द + णारे —- कोण? कर्ता गडगड कर्ता गडगड हा क्रियापदामध्ये समाविष्ट / समावलेला दिसतो गडगडते भावकर्तृक क्रियापद
उदा. 4.मला आज मळमळते क्रियापद:- मळमळते मूळशब्द:- मळमळ—–स्त्री धातु मुळ शब्द $ णारी—- कोण? कर्ता मळमळणारी—– कोण? कर्ता? मळमळ कर्ता मळमळ क्रियापदामध्ये समावलेला दिसतो. म्हणून मळमळते भावकर्तृक क्रियापद.
13.करणरुप क्रियापद / होकारार्थी क्रियापद:-
-वाक्यातील क्रियापदाने केलेले विधान होकारार्थी असेल तर त्यास होकारार्थी क्रियापद असे म्हणतात.
उदा.
1.नेहमी खरे बोलावे. 2.सकाळी नियीमत व्यायाम करतो. 3.राम अभ्यास करतो. 4.वैशाली शाळेत जाते. 5.आज रविवार आहे. 6.सुर्य पुवीकडे उगवत असतो. 7.माझी परीक्षा काल संपली. 8.नागरीकांनी वृक्षारोपण करावे. 9.विद्यार्थांना पुरस्कार मिळाला. 10.स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे
14. अकरणरुप क्रियापद / नकारार्थी क्रियापद:-
-वाक्यातील क्रियापदाचे केलेले विधान नकारार्थी असेल तर ल्या क्रियापदाला नकारार्थी / अकरणरुप क्रियापद असे म्हणतात.
या क्रियापदात नाही, नको, नलगे, नव्हे, या सारखे क्रियापद आलेले असतात.
उदा.
1.विद्यार्थानी खोटे बोलू नये. 2.आज वर्गात विद्यार्थी नाहीत. 3.असे वागणे योग्य नव्हे. 4.मुलांनो गोंधळ करु नका. 5.सुùास अधिक सांगणे नलगे. 6.परवांगी शिवाय आत येवू नये. 7.धुम्रपान करने योग्य नाही. 8.गावातील शातंता भंग करु नको. 9.रात्री झाडांना हात लावू नये. 10.शिक्षकांनी वर्गात मार्गदर्शन केले नाही